नागपूर (Nagpur). शासनाकडून (the government) कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय केन्द्रावर शनिवारी ३१ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
[read_also content=”नागपूर/ सिताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये लहान मुलेसुद्धा हौशीने येणार; बालस्नेही कक्ष स्वागताला मिळतोय प्रतिसाद https://www.navarashtra.com/latest-news/children-will-also-come-to-sitabardi-police-station-enthusiastically-the-child-friendly-room-welcome-response-nrat-162792.html”]
लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षा व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.
तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.