लखनौ : बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत (Wall Collapsed) पावसामुळे कोसळल्याने सात मुले ढिगाऱ्याखाली दबली (Buried Under Rubble) गेली. यात दोन मुलांचा मृत्यू (Died) झाला असून पाच जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील अलिगड (Aligarh) जिल्ह्यातील हुसेनपूर शहजादपूर परिसरात शनिवारी (ता. ३०) दुपारी घडली.
हुसेनपूर शहजादपूर येथे घर बांधले जात आहे. जवळच शाळेतून परतलेली मुले घरी जात असताना अचानक बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. कोणाला समजेपर्यंत ७ मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. हे पाहून स्थानिक नागरिकांनी घाईघाईने ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
पोलिस-प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची मदत घेत जेसीबीने ढीगारा हटवून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोन मुलांचा मृत्यू (Died) झाला होता. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या पाच मुलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. यानंतर त्यांना अलिगड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.