अजमेर: अजमेरमधील किशनगढमध्ये पोलिसांनी भाजप नेते रोहित सैनीला अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या हत्येच्या प्रकरणी त्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
नेमकं काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील अजमेर येथे एका भाजप नेत्याला त्याच्या पत्नीची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी घडली आणि ती दरोडा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु पोलिसांनी ती हत्या असल्याचे उघड केले. २४ तासांत हत्येचे गूढ उकलले आहे.
प्रेयसीसाठी पत्नीची हत्या
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भाजप नेते रोहित सैनी यांनी त्यांची प्रेयसी रितू सैनी हिच्या सांगण्यावरून पत्नी संजुची हत्या केली. सुरुवातीला रोहितने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की, काही अज्ञात दरोडेखोर घरात घुसले, संजुची हत्या केली आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेले. परंतु जेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली तेव्हा रोहितचे जबाब वारंवार बदलू लागले. या विरोधाभासानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. अज्ञाताने घरात दरोडा टाकून पत्नीची हत्या केली, असं त्याने पोलिसांना सांगितलं. रचलेली स्टोरी खरी वाटावी, यासाठी आरोपी भाजप नेता बराच वेळ पत्नीच्या मृतदेहाजवळ रडत बसला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही.
दबावाखाली हत्या
आरोपीची काटेकोरपणे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रोहितने सांगितले की, त्याचे त्याची प्रेयसी रितूसोबत दीर्घकालीन संबंध होते आणि पत्नी संजू त्यांच्या नात्यात सर्वात मोठा अडथळा होती. संजूला रस्त्यावरून हटवण्यासाठी रितूनेच त्याच्यावर दबाव आणला आणि या दबावाखाली रोहितने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
हत्या केल्यानंतर, रोहितने संपूर्ण घटनेला दरोड्यासारखे बनवण्याची योजना आखली जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल, परंतु हा कट उघडकीस आला. या प्रकरणात, मुख्य आरोपी रोहित सैनीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आता तपासादरम्यान त्याची प्रेयसी रितूचा सहभाग उघडकीस आल्याने पोलिसांनी तिलाही अटक केली आहे. पोलीस आता दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार