कुठून येतात हे लोक? चोरट्यांनी कचऱ्याचा डबाही सोडला नाही; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यामध्ये स्टंट, जुगाड, डान्स रिल्स, भांडण यांसारखे व्हिडिओ, तसेच अपघाताचे, चोरीच्या घटनांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता रात्रीच्या काळोख्यात चोरी करणारे पठ्ठे दिवसा-ढवळ्या चोरी करायला अजिबात घाबरत नाही.
चोरीच्या घटनांमध्ये तुम्ही आतापर्यंत, दागिन्यांची, पैश्यांची, गाडीच्या चोरीची घटना ऐकल्या असतील. पण अलीकजे आता चोरांचाही भरोसा राहिलेला नाही. कोण कधी काय चोरी करेल याचा भरोसा नाही. आता हेच पाहाना चंदीगडमध्ये एका चोराने कचऱ्याचा डबाही सोडलेला नाही. शिवाय दिवसा-ढवळ्या चोरी केली आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय यापूर्वी काही लोकांनी घराबाहेरच्या कुंड्या, बस स्टॅंडवरील बॅंचे देखील गायब केले आहेत.
चंदीडगमध्ये ही घटने घडली असून घराच्या मालकाने कचऱ्याचा डब्बा शोधण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, दोन चोर स्कूटीवरुन येतात. एका घराबाहेर थांबतात. एक चोर उतरून घराच्या आसपासचा परिसर पाहतो आणि बाहेर असलेले कचऱ्याचा डबा उलचलून आपल्या साथीदारासोबत आरामात तिथून जातो. या घटनेचा व्हिडिओ मालकाने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.
एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral
“It has been 24 hours since the incident. Requesting the Chandigarh Administration & @chandigarhpolice to kindly help track the scooter number of the individual involved and take strict action at the earliest. Public safety must.@Gagan4344 @manaman_chhina @DgpChdPolice pic.twitter.com/o8p0kltx1N
— Aditya Pratap Singh Chahal (@APS_CHAHAL_) August 15, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मालकाने @APS_CHAHAL_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीची पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांमध्ये हशा पिकला आहे. आता चोर कचऱ्याचा डबा देखील चोरायला लागल्याने लोक हैराण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत.
आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.