३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! 'हे' आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी
हल्ली कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. वातावरणातील बदल, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. केस अचानक पांढरे झाल्यानंतर केस काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आणि हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. याशिवाय सतत केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांची मूळ अतिशय कमकुवत आणि नाजूक होऊन जातात. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी सतत केसांना डाय लावणे किंवा रंग लावला जातो. मात्र हा रंग काही दिवसानंतर उडून जातो आणि केस अतिशय पांढर दिसू लागतात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी कोणत्याही चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक उपाय करून केसांची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
केस पांढरे झाल्यानंतर केसांना रंग किंवा डाय लावण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून केसांची योग्य काळजी घ्यावी. आयुर्वेदिक पदार्थांच्या वापरामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर, मुलायम दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे केस आणखीनच सुंदर आणि काळे दिसू लागतील.
केस पांढरे होणे किंवा केस अचानक तुटू लागल्यास आयुर्वेदिक पावडरचे नियमित सेवन केल्यास केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतील. यासाठी आवळा पावडर आणि ब्राम्ही एक बंद डब्याच्या झाकणामध्ये भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात गुणकारी पावडरचे सेवन केल्यास केसांवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. तसेच या पावडरचे नियमित सेवन केल्यामुळे पित्त दोष संतुलित राहण्यास मदत होते. आवळ्यामध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.
केस स्वच्छ करण्यासाठी हर्बल शँम्पूचा वापर करावा. यासाठी आवळा, रिठा, शिकेकाई, भृंगराज पावडर एकसमान घेऊन एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी तयार केलेले पाणी टोपात घेऊन गरम करा आणि थोडस थंड करा. तयार केलेले मिश्रण केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या.