फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये एकादशीला व्रताला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी २४ एकादशी असतात, त्यापैकी जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशी तिथीला विशेष महत्त्व असते. यावेळी ही एकादशी मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी आहे. एकादशीच्या व्रताच्या दिवशी पूजा, उपवास आणि काही उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. तसेच आर्थिक संकट आणि कुटुंबातील समस्या दूर होतात. एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या.
पंचांगानुसार, एकादशी तिथीची सुरुवात सोमवार, 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.22 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3.32 वाजता संपेल. उद्यतिथीनुसार ही तिथी मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सिद्धी योग तयार होणार आहेत. या शुभ योगामुळे विष्णूंची केलेली पूजा अधिक फायदेशीर मानली जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते.
अजा एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा झाल्यानंतर त्यांना केशरयुक्त दूध अर्पण करावे. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्या साधकाला विशेष आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. तसेच, घरातमध्ये आनंदाचे वातावरण राहते आणि नातेसंबंध मजबूत राहते.
जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य काही कारणास्तव नाराज असल्यास आजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यानंतर देव्हारा, स्वयंपाकघर आणि तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. तसेच विष्णू मंत्रांचा जप करावा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि वारंवार होणारे वाद कमी होण्यास मदत होते.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करुन दिवसभर उपवास करावा. त्यानंतर मंत्रांचा जप करावा. तसेच गाईची सेवा करावे आणि गाईंना गुळांसह 4 रोट्या खायला द्याव्यात. यावेळी तुमची इच्छा 3 वेळा मनात बोला. असे काही उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
कृष्ण पक्षातील एकादशीला आजा एकादशीचे व्रत पाळले जाते हे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. हे व्रत नियमितपणे केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य मिळते आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. त्यासोबतच अजा एकादशीचे व्रत करणे हे हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञ करण्यासारखे आहे. या व्रतामुळे जीवनातील दु:ख दूर करण्याचे काम करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)