Eight Month Old Baby Dies After Lemon Stuck In Throat Incident At Nandani Kurundwad Nrka
घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; नांदणी येथील घटना
नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Boy Died) झाला. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुरुंदवाड : नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून (Lemon Stuck in Throat) आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Boy Died) झाला. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदणी येथे जयसिंगपूर मार्गावर पलसे कुटुंबीय राहते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मयुरेशची आई जेवण करत होती. तर वडील विशाल घराच्या दारात बसले होते. यादरम्यान, मयुरेश खेळत असताना घरात पडलेला लिंबू त्याने तोंडात घातला आणि तो त्याच्या घशात अडकला.
पालकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याला तत्काळ गावातील दवाखान्यात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी जयसिंगपूर येथे नेण्यास सांगितले. नंतर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घशात लिंबू अडकून श्वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, थोड्याशा दुर्लक्षामुळे मयुरेशला त्याचा जीव गमवावा लागला. जर त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे लक्ष दिले असते तर कदाचित मुयरेशचा जीव वाचला असता हीच भावना व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने शिरोळ तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे .
Web Title: Eight month old baby dies after lemon stuck in throat incident at nandani kurundwad nrka