खासगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी... केंद्र सरकार घेणार हे दोन मोठे निर्णय! वाचा... सविस्तर!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याबाबत नियम बदलले गेले आहे. हा बदल सर्व पीएफ खातेधारकांसाठी आहे. ईपीएफओने पीएफ खात्यातील माहिती सुधारण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन सर्व पीएफ खातेधारकांना करायचे आहे. ईपीएफओने जारी केलेले हे नवीन नियम कोणते? याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया…
एसओपी आवृत्ती ३.० मंजूर
ईपीएफओने नाव, जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहे. याअंतर्गत पीएफ सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी एसओपी आवृत्ती ३.० मंजूर करण्यात आली आहे. या नवीन नियमांचे पालन करुन युएएन प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागणार आहे.
दोन श्रेणींमध्ये विभागणी
ईपीएफओने आपल्या गाइडलाईन्समध्ये म्हटले आहे की, पीएफ खात्यामधील माहितीमध्ये अनेक चुका आहे. या चुका सुधारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डेटा अपडेट न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आता तुम्हाला प्रोफाइल अपडेट करावा लागणार आहे. ईपीएफओने प्रोफाइलमधील बदलांना लहान मोठ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे
किरकोळ बदलांसाठी दोन आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. तर मोठ्या सुधारणांसाठी तीन आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहे.प्रोफाइल अपडेट करताना पीएफ खातेधारकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. जेणेकरुन कोणतीही फसवणूक होणार नाही. ईपीएफओद्वारे जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार, तुम्हाला प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. ईपीएफ सदस्यांना ई- सेवा पोर्टलद्वारे दुरुस्तीसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियोक्ताद्वारे ईपीएफ खात्याशी संबंधित डेटामध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात.