प्रतिकात्मक फोटो
वर्धा (Wardha). जिल्हा प्रशासनाने (The district administration) कोविड रुग्णसंख्या (Covid patients) कमी करण्यासाठी जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध १८ मे पासून ग्रामीण भागात थोडे शिथिल करत शहरी भागात पूर्वीप्रमाणेच 1 जूनपर्यंत वाढवले. त्यामुळे हा आदेश सर्वांनाच धडकी भरवणारा ठरला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने व्यापारी, व्यावसायिक, विक्रेत्यांसह (traders, traders and vendors.) सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती (arge gram panchayats) यांच्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळी 7 ते 1 या कालावधीत चालू ठेवता येणार आहेत. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
[read_also content=”कोरोनामुळे जिल्ह्यातील २५० नवउद्योग ठप्प; मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे बँकाकडे प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित https://www.navarashtra.com/latest-news/250-new-industries-in-the-district-stalled-due-to-corona-cm-job-creation-proposal-pending-with-the-bank-for-over-a-year-nrat-130378.html”]
शहरी भाग
नगरपालिका व लगतच्या मोठ्या 11 ग्रामपंचायती पुलगाव व लगतच्या 2 ग्रामपंचायती, सिंदी रेल्वे, हिंगणघाट नगर परिषद व लगतच्या 4 ग्रामपंचायती आर्वी, देवळी सेलू, नगरपालिका व समुद्रपूर कारंजा आष्टी या नगरपंचायत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ठरलेल्या दिवशी सकाळी 7 ते 1 पर्यंत घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
सोमवार- बुधवार -शुक्रवार
सर्व किराणा माल, डेअरी, बेकरी, मिठाई अंडे, मटन, पोल्ट्री, कोंबडी, मासे, पिठाची गिरणी तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने ठरविलेल्या वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल.
मंगळवार, गुरूवार व शनिवार
या दिवशी सर्व भाजीपाला व फळविक्रेते यांची दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळ 7 ते दुपारी 1 वाजपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील.
ग्रामीण भाग
नगरपरिषदेला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. ग्रामीण भागातील आधार केंद्र शेतकऱ्यांकरिता सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी सबंधित असणा-या साहित्याच्या निगडीत दुकाने सोमवार ते शनिवार फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील. गॅसएजन्सी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजनथाळी सकाळी 11 ते रात्री 8, दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील.
शेती संबंधित दुकाने ७ ते १ पर्यंत सुरू
कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी सबंधित दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याकरीता सुरू राहतील. मात्र, शेतक-यांना आवश्यक त्या वस्तुचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतस्तरावर संबधित कृषिसेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. सार्वजनिक, खासगी क्रिंडागणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पूर्णता बंद राहील. केशकर्तनालय, सलून, स्पा, ब्युटीपार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. तथापी ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.
लग्न समारंभाला २० लोकांनाच परवानगी
लग्न समारंभ, स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी राहील. नागरी भागातील पेट्रोलपंप सकाळ 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना इंधन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांची राहील. सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहन यांची वाहतुक पूर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
सुरू राहणारे व्यवसाय व संस्था
खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहील, अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबधित शासकीय, निमशाकीय कार्यालये, एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सतुगिरणी सुरू ठेवण्यासाठी केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील.
शासकीय यंत्रणामार्फत मान्सुपूर्व विकासकामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयक कामे चालू राहील. यंत्रणांना वेगळया परवानगीची आवश्यकता राहणार नाही. घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर आवश्यक तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.