नागपूर (Nagpur) : ‘आई, तू माझ्या मुलांचा सांभाळ कर’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाच्या पत्नीने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी ३ वाजताच्या सुमारास शिवणगावमधील सीआरपीएफ कॅम्प येथे घडली. पूनम राजकुमार डगवार (वय ३१), असे मृतकाचे नाव आहे.
[read_also content=”नागपूर/ मोबाइलमध्ये अश्लील चित्रफित दाखवून आठ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार https://www.navarashtra.com/latest-news/mass-atrocity-on-an-eight-year-old-girl-by-showing-pornographic-videos-in-her-mobile-nrat-216951.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हे झारखंडमधील रांची येथे तैनात आहेत. पूनम या दोन मुलांसह सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहायची. २७ डिसेंबरला राजकुमार हे घरी आले. यावेळी त्यांचा पूनम यांच्यासोबत वाद झाला. राजकुमार रांचीला परतले. मंगळवारी दुपारी पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी पूनम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, आई तू माझ्या मुलांचा सांभाळ कर’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.