मुंबई : भाजपच्या दहशतीला कंटाळून मुंबईत येवून आत्महत्या करणारे दादरा नगर हवेलीचे दिवंगत लोकसभा सदस्य मोहन डेलकर याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकीपूर्वी या दमदार विजयाने गुजराती मतदारांवर प्रभाव पाडणे सोपे होणार आहे. ऐन दिवाळीत शिवसेनेचा राज्याबाहेरचा हा पहिलाच विजय जल्लोषात साजरा केला जात आहे(After the first victory outside Maharashtra, Shiv Sainiks celebrate Diwali outside Shiv Sena Bhavan ).
मुंबईच्या दादरात दादरा नगर हवेलीच्या विजयासाठी दिवाळी साजरी केली जात आहे. शिवसेना भवनसमोर शिवसैनिकांनी जल्लोष करत ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. महाराष्ट्राबाहेर सेनेचा उमेदवार जिंकला, ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी दिवाळी आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम आता राज्याबाहेरही पोहचत आहे अशी प्रतिक्रिया युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली आहे.
महत्वाचे म्हणजे या निवडणुकीसाठी वीस वर्षापूर्वी स्व बाळासाहेब ठाकरे जीवनात पहिल्यांदा आणि एकमेव राज्याबाहेरची सभा घेण्यासाठी दादरा नगर हवेलीत गेले होते. मात्र तेथील जनतेने आता त्यांच्या नातवाच्या हाती पक्षाच्या निवडणुकांची सूत्रे सोपविली जात असताना हा विजय दिल्याने त्याचे वेगळे महत्व आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. हक्कासाठी या पुढेही लढत राहणार असल्याचे आश्वासन शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी दिले आहे. मोहन डेलकर यांच्याबरोबर जो अन्याय झाला आहे त्याविरोधात लढत राहणार असल्याचंही कलाबेन डेलकर यांनी म्हटले आहे.
या विजयाने शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर दमदारपणे पाऊल टाकले असून आगामी गोवा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात भाजप समोर हिंदुत्वाच्या मुद्यावर लढण्यासाठी या विजयाने शिवसेनेला नवे बळ येणार आहे, दादरा नगर हवेलीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा ध्वज आज महाराष्ट्राबाहेर गेला आहे. एक शिवसैनिक म्हणून आपल्यासाठी ही आंनदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
हुकुमशाहीला कंटाळून मोहन डेलकर यांनी मुंबईत आपली जीवनयात्रा संपवताना आपल्या पत्रात जी भावना व्यक्त केली होती, की मला महाराष्ट्रातून न्याय मिळेल, म्हणून महाराष्ट्रात आलो, महाराष्ट्राने त्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्या आत्महत्येसंदर्भात एसआयटी तपास सुरु आहे, शिवसेनाही त्यांच्या कुटुंबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आता शिवसेनेचे २२ खासदार दादरा नगर हवेलीचे प्रश्न घेऊन उभे राहितील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/latest-news/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]