Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद
PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमणविरोधी मोहिमेचा धडाका, तब्बल ८२० ठिकाणी कारवाई
परिषदेला मान्यवर करणार मार्गदर्शन
या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान उद्योग जगताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल परिवर्तन, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा तसेच महिला उद्योजकतेला चालना देणे यांसारख्या विषयांवर विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
‘महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६’ चे वितरण
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एमएसएमई उद्योगांचा गौरव करण्यासाठी “महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६’ चे वितरण केले जाणार आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकता, नवीन उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार नऊ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये प्रदान केले जातील. यामध्ये आर्टिसन/हँडिक्राफ्ट पुरस्कार, नेक्स्टजेन पुरस्कार, डिजिटल आणि एआय एक्सलन्स पुरस्कार, सर्व्हिस पुरस्कार, मॅन्युफॅक्चरिंग पुरस्कार, ग्रीन एंटरप्राइझ पुरस्कार, वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कार आणि एक्सपोर्ट पुरस्कार यांचा समावेश आहे.
मोठी बातमी ! राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र सिंघल आता ACB प्रमुख
उद्योजकांनी परिषदेत सहभागी व्हावे
महाराष्ट्रातील सर्व एमएसएमई उद्योजकांना या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांतर्फे करण्यात आले आहे. परिषदेच्या दिवशी म्हणजेच दि. २७ जून २०२६ रोजी सायंकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एका पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालिका यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






