मुंबई : रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर जिनिलियाने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश बोलतो की, “ईमेलने कितीही प्रगती केली असली तरी ते स्त्रियांपेक्षा जलदगतीने बातमी पोहोचवू शकत नाही.” रितेश असं बोलतं असताना जिनिलिया फोनमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. त्या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात. ते सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. आणि आता नव्या व्हि़डिओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.






