मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शनही झालंय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचंही गुरुवारी (5 सप्टेंबर) प्रथम दर्शन घडलंय. यावेळी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली.
पुतळाबाई चाळीमध्ये असलेला लालबागचा राजा किंवा ‘किंग ऑफ लालबाग’ हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिलं जाणारं गणेश मंडळ आहे.
लालबागच्या राजाची आज पहिली झलक पाहायला मिळाली.
अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या देखील डोळे दीपतील असे लालबागच्या राजाचे सुंदर रूप पाहायला मिळाले.
मरून रंगाच्या वेल्वेटच्या पितांबरमधील राजाचे हे रूप डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.
लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे.