नागपूर (Nagpur). महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर (visit to Nagpur) आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांच्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी त्यांचं स्वागत केलं.
[read_also content=”इस्लामपूर/ अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, ‘या’ विषयात चालढकल चालली आहे; चंद्रकांत पाटील https://www.navarashtra.com/latest-news/expertise-is-needed-for-the-study-chandrakant-patil-allegation-on-reservation-issue-nrat-141501.html”]
भगतसिंह कोश्यारी 11 ते 14 जून दरम्यान 3 दिवस नागपूरमध्ये असतील. या काळात ते अनेक भेटीगाठी करणार असून कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.
Governor Bhagat Singh Koshyari arrived in Nagpur on a 3 – day visit. Mayor of Nagpur Dayashankar Tiwari, Collector Ravindra Thakre, Commissioner of Police Amitesh Kumar welcomed the Governor. pic.twitter.com/TOd9hTv9dV
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 11, 2021
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय दौऱ्यानंतर 14 जूनला पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या काळात ते विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्याबाबत राज्यपाल कार्यालयानेही ट्विट करत माहिती दिली.
यात म्हटलं, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे तीन दिवसांच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.”