नेमबाजीत ईशा सिंगची ब्राँझ पदकाला गवसणी(फोटो-सोशल मीडिया)
Isha Singh wins bronze in shooting at Cairo tournament : ईशा सिंग हिने कैरो येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदकावर मोहर उमटवली. मनू भाकर हिला मात्र पदकापासून दूर राहावे लागले. महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिलाही अपयशाचा सामना करावा लागला. भारतीय नेमबाजांनी या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण, ५ रौप्य व ४ ब्राँझ अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. भारतीय संघ पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला.
हेही वाचा : IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?
चीनच्या एकूण १८ पदकांसह (१० सुवर्ण, ६ रौप्य व २ ब्राँझ) पहिले आणि कोरियन संघाने ११ पदकांसह (६ सुवर्ण, २ रौप्य व ३ ब्राँझ) दुसरे स्थान पटकावले. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये मनू भाकर व इशा सिंग या भारतीय नेमबाजांनी छान खेळ केला. ईशा सिंग हिने ५८७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले. मनू भाकर हिने ५८६ गुणांसह सहावे स्थान पटकावले. यांग जिन हिने ५९१ गुणांसह पात्रता फेरीमध्ये पहिल्या स्थानावर मुसंडी मारली.
महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये ऑलिंपिक पदक विजेती कोरियाच्या यांग जिन हिने ४० गुणांसह सुवर्ण पदकावर हक्क सांगितला. तसेच चीनच्या याओ कियानशून हिने ३८ गुणांसह रौप्य पदकाला गवसणी घातली. ईशा सिंग हिने ३० गुणांसह ब्राँझ पदक पटकावले. मनू भाकरला शूट ऑफमध्ये हार पत्करावी लागली. ती २३ गुणांसह पाचव्या स्थानी राहिली.
हेही वाचा : IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
तिसरे वैयक्तिक पदक ईशा सिंग हिचे हे या वर्षातील तिसरे वैयक्तिक जागतिक पदक ठरले आहे. याआधी सुवर्ण व रौप्य पदक पटकावण्यात तिला यश मिळाले आहे. आता येत्या डिसेंबर महिन्यात दोहा येथे नेमबाजी विश्वकरंडक फायनल्स होणार आहे. यामध्ये तिचा सहभाग निश्चित असणार आहे.
आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व फ्रँचायझींकडून त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२६ साठी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना अंत एकदाच आता पूर्णविराम मिळाला असून बीसीसीआयने ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी अखेर जाहीर केली आहे. यानुसार, आगामी हंगामात केवळ जडेजा आणि सॅमसनच नाही, तर अर्जुन तेंडुलकर आणि शमी यांच्या संघात देखील बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर ५ खेळाडूदेखील नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे.






