महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
‘नानासाहेब धर्माधिकारी’ अर्थात नारायण विष्णू धर्माधिकारी यांची आज जयंती. त्यांनी आजन्म समर्थसेवा करुन आध्यात्माचा प्रसार व प्रचार केला. महाराष्ट्र भूषण ‘नानासाहेब धर्माधिकारी हे प्रख्यात आध्यात्मिक प्रवचनकार आणि समाजप्रबोधक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात झाला. त्यांनी ‘श्रीसमर्थ बैठक’ या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवा यांचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवला. त्यांच्या प्रवचनांतून सत्य, शिस्त, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांवर भर दिला जात असे. नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. साधी जीवनशैली आणि प्रभावी वाणी यामुळे त्यांना जनमानसात विशेष स्थान मिळाले. अध्यात्म आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडवून त्यांनी समाजाला प्रेरणादायी दिशा दिली. (Dinvishesh)
01 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
01 मार्च रोजी जन्म दिनविशेष
01 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






