JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा... यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे
कंपनीकडे असा एक रिचार्ज प्लॅन आहे, ज्याची किंमत 500 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 10 हून अधिक ओटीटी फायदे ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. ओटीटी फायद्यामुळे हा प्लॅन अतिशय खास बनतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी अत्यंत कमी असली तरी देखील प्लॅनमध्ये 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फायजे मिळतात. या प्लॅनबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
न्यू ईयर ऑफरचा एक भाग म्हणून कंपनीने एक प्रीपेड प्लॅन सादर केला होता. या प्लॅनची किंमत 500 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. जिओच्या 500 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 एसएमएस प्रितिदिन आणि 2GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 56GB डेटा दिला जातो. एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 50GB फ्री जिओ एआय क्लाऊड स्टोरेज मिळणार आहे.
यासोबतच, यूजर्सना 2000GB गूगल क्लाउड स्टोरेजसह 35,100 रुपयांचा 18 महीन्याचा गूगल जेमिनी एआई प्रो प्लॅन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर करते. एड-ऑन सब्सक्रिप्शनमध्ये यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडीओ मोबाईल एडिशन आणि जियोहॉटस्टार (TV/मोबाइल) समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त यूजर्सना या प्लॅनमध्ये सोनीलिव, ZEE5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फॅनकोड आणि जिओटिव्ही अॅपद्वारे होईचोई सारख्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सचा एक्सेस देखील मिळणार आहे.
फेयर यूसेज पॉलिसी (FUP) 4G डेटाचा वापर केल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. लक्षात ठेवा की रिलायन्स जिओने म्हटले आहे की गुगल जेमिनी ऑफर फक्त 349 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या सक्रिय अमर्यादित 5G प्लॅन असलेल्या यूजर्ससाठी उपलब्ध असेल.






