उन्हाळ्यात फणस फार आवडीने खाल्ला जातो. फणस खाण्याचे भरपूर फायदेही आहेत. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अँसिड, मॅग्नेशियम असते. हे सर्व घटक उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे तज्ज्ञ सांगतात.
या फणसामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली असते जी फणसाच्या गर्यांइतकीच चवदार लागते. ती सुकवतात. त्या उकडूनही खाल्ल्या जातात आणि त्याची भाजीही केली जाते. इतर भाज्यांमध्ये चव वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. त्या म्हणजे फणसाच्या बिया. या खाल्ल्याने कोलेरेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट तसेच आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायकदेखील आहेत.
[read_also content=”हा तर आम्ही फारच पूर्वीपासून करत आलो आहोत, जपानची विश्वासार्ह भारतीय भागीदारी; शह-काटशहाच्या राजकारणात कोण ठरणार सरस https://www.navarashtra.com/latest-news/japans-trusted-indian-partnership-nrvb-134741.html”]
फणसाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होतो. लो बीपी असणार्यांनी फणसाच्या निया खाणे टाळावे. तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल. फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
[read_also content=”आमचं अजून ठरलंच नाही : विद्यार्थी-पालक तणावात, १२वीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता; आता निर्णय १ जूनला https://www.navarashtra.com/latest-news/student-parent-tension-uncertainty-about-hsc-exam-nrvb-134738.html”]
जर एखाद्या व्यक्तीला हायपोग्लाइसीमिया असेळ तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. रक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण जे आधीच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खात आहेत त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्याने ते आणखी पातळ होण्याची शक्यता असते.
jackfruit seeds are equally dangerous for health