आपल्या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आपल्या कल्पनेपलीकडची आहेत. आपण पृथ्वीबद्दल जितके अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्याला प्रत्येक वेळी आश्चर्यचकित करते. आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जे अनेक वर्षांपासून अखंड ज्वलंत आगीने जळत आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये एक ठिकाण आहे ज्याला ‘दरवाजा गॅस क्रेटर’ (Darvaza gas crater) असे म्हटले जाते. ही जागा 50 वर्षांहून अधिक काळ जळत आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातही एक अशी जागा आहे जी सुमारे 108 वर्षांपासून जळत आहे आणि ती आजवर कधीही विझली नाही.
या आगीचा सर्वाधिक फटका येथील स्थानिकांना बसतो. आम्ही तुम्हाला सांगतो, आगीची बाब पहिल्यांदा 1916 मध्ये समोर आली होती. भूगर्भातील आग विझवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु ते निष्फळ ठरले. कारण सुरुवातीच्या टप्प्यात ही आग विझवण्याबाबत गांभीर्य दाखवले गेले नाही. चला या ठिकाणाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
झारखंडमध्ये आहे हे ठिकाण
झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील झरियामध्ये वर्षानुवर्षे पृथ्वीच्या खाली आग जळत आहे. झरिया (Zaria) हे उत्कृष्ट दर्जाच्या कोळशासाठी देशात आणि जगात ओळखले जाते, येथेच उच्च दर्जाचा बिटुमिनस कोळसा आढळतो, ज्याला कोक म्हटले जाते. इतकेच नाही तर झरिया हा भारताच्या औद्योगिक विकासाचा अविभाज्य भाग आहे. इतकेच नाही तर अनेक दशकांपासून झरियाच्या कोळशावर भारतातील गाड्या चालवल्या जात होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजही भारतातील 65 टक्क्यांहून अधिक वीज पुरवठा कोळशापासून केला जातो.
का जळत आहे हे ठिकाण?
झरिया 100 वर्षांहून अधिक काळ आतल्या आत जळत आहे. अशा परिस्थितीत ही जागा इतके दिवस का जळत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाणीला लागलेल्या आगीचा इतिहास झरिया कोळसा पट्ट्यातील खाणकामाच्या इतिहासाइतकाच जुना आहे. खाणींना आग लागण्याचे प्रमुख कारण खाजगी मालकांची चूक असल्याचे सांगितले जाते. खरंतर, खाणकाम करताना झरिया आणि आजूबाजूच्या खाणींमध्ये काही टक्के कोळसा जमिनीखाली सोडला जात होता, कोळसा निर्धारित वेळेत बाहेर काढला नाही तर तो स्वतःच जळू लागतो, असे सांगितले जाते. त्यानंतर आग पसरतच गेली. 1916 मध्ये झरिया येथे आगीचा पहिला पुरावा सापडला होता.
Stressful Cities: हृदय कमकुवत असेल तर या शहरांना कधीही भेट देऊ नका, साहस प्रेमींसाठी खास
या ठिकाणी कसे जात जाईल?
झरिया शहराला स्वतःचे विमानतळ नाही, त्यामुळे रांचीचे बिरसा मुंडा विमानतळ सर्वात जवळचे आहे. तुम्ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा इत्यादी प्रमुख भारतीय शहरांमधून थेट फ्लाइट घेऊ शकता. तुम्ही ट्रेनने येत असाल तर, धनबाद रेल्वे स्टेशन हे झरियाचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि झरियाला इतर शहरांशी जोडते. यासह झारखंड स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (JSRTC) झरियापासून येण्याजाण्यासाठी नियमित अंतराने येथून बसेस चालतात. झारखंडमध्ये आल्यानंतर टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि मिनी बसने झरियाला पोहोचता येते.