(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सीझन सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. लवकरच बिग बॉस मराठी ६ ची दारं उघडणार आहेत. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरून पहिल्या स्पर्धकाचा प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. तर सोशल मीडियावर काही नावांची चर्चा देखील रंगू लागली आहे. नुकतच एका स्पर्धकाचे नाव कन्फर्म झालं आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील मुख्य अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसणार आहे. राकेश बापटची एन्ट्री कन्फर्म करण्यात आली आहे. राकेशची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. यापूर्वी राकेश हिंदी बिग बॉसमध्येही दिसला होता. त्यांनतर त्याने नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. अद्याप राकेशच्या टीमने किंवा स्वत:अभिनेत्याने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
हा शो नक्की प्रेक्षकांचं मनोरंजन दुप्पट करणार आहे.‘बिग बॉस’ मराठीचं यंदाचं घर हे सोपं नसणार आहे. यावेळी ‘स्वर्ग आणि नर्क’ अशी थक्क करणारी थीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान,११ जानेवारीपासून बिग बॉस मराठी ६ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये राकेश बापटसह सागर कारंडे, दिपाली सय्यद, अनुश्री माने, राधा मुंबईकर, संकेत पाठक, प्राजक्ता शुक्रे, रसिका जामसुदकर या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यापैकी कोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतात हे लवकरच कळेल.






