भारताच्या सुरक्षेसाठी आयुष्य पणाला लावणारे 'हे' ३ 'धुरंधर' तुम्हाला माहीत आहेत का? (Photo Credit- X)
१९५२ मध्ये एका एअरफोर्स कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र कौशिक यांची कथा कोणत्याही थरारपटापेक्षा कमी नाही. त्यांच्यातील जबरदस्त अभिनय कौशल्य पाहून R&AW (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) ने त्यांना रिक्रूट केले. १९७३ मध्ये त्यांनी इस्लामचा सखोल अभ्यास केला, उर्दू शिकली आणि पाकिस्तानची भौगोलिक माहिती मिळवली. १९७५ मध्ये ते ‘नबी अहमद शकीर’ बनून पाकिस्तानात शिरले. तिथे त्यांनी चक्क कराची युनिव्हर्सिटीतून लॉ पदवी घेतली आणि पाकिस्तान आर्मीमध्ये भरती झाले. आपल्या हुशारीच्या जोरावर ते मेजर पदापर्यंत पोहोचले. त्यांनी दिलेल्या इंटेलिजन्स इनपुट्समुळे अनेक सीमापार हल्ले रोखले गेले आणि हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले. खुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘द ब्लॅक टायगर’ हे कोडनेम दिले होते. दुर्दैवाने १९८३ मध्ये ते पकडले गेले आणि २००१ मध्ये पाकिस्तानच्या जेलमध्येच त्यांना वीरमरण आले.
स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू
भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे एकेकाळी मैदानावर उतरून काम करणारे धडाडीचे हेर होते. १९८० च्या दशकात ते तब्बल ६ वर्षे पाकिस्तानात वेषांतर करून राहिले. भारताला संशय होता की पाकिस्तान ‘खान रिसर्च लॅब’मध्ये अण्वस्त्र बनवत आहे. डोवाल यांनी नोटीस केले की तिथले शास्त्रज्ञ एका ठराविक सलूनमध्ये (Barber Shop) जायचे. त्यांनी भिकाऱ्याचा वेष धारण केला आणि त्या दुकानाबाहेरून शास्त्रज्ञांच्या केसांचे नमुने गोळा केले. जेव्हा भारतात त्या केसांची तपासणी झाली, तेव्हा त्यात रेडिएशन आढळले आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा पुरावा जगासमोर आला.
सहमत खान यांची कथा ही केवळ देशभक्तीची नाही तर अतोनात त्यागाची सुद्धा आहे. आपल्या मरणासन्न वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एका पाकिस्तानी लष्करी कुटुंबात लग्न केले. १९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने भारताची युद्धनौका ‘INS विक्रांत’ नष्ट करण्याचा कट रचला होता. सहमत खान यांनी ही गुप्त माहिती वेळीच भारताला दिली. जेव्हा त्यांच्या पतीला त्यांच्यावर संशय आला, तेव्हा देशाच्या सुरक्षेसाठी त्यांना आपल्या पतीलाच संपवावे लागले. जेव्हा त्यांना भारतात परत आणले गेले, तेव्हा त्या विधवा आणि गर्भवती होत्या. त्यांच्याच जीवनावर आधारित ‘राझी’ हा चित्रपट बनला आहे.
1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण






