पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही, मनसेचे संतोष गांगुर्डेंचा सरकारला इशारा
के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात १४ जूनपासून कॉलेजसमोर साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही.
के. व्ही. पेंढरकर कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी, व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाचाही ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे.
आज मनसे शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली. एक तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर देसाई यांच्याकडून मनसेला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बोलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सरची गरज काय? प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम न देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. त्यानंतर प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले. यादरम्यान डोंबिवली मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण, मिलिंद म्हात्रे, धनंजय गुरव, प्रिंतेश पाटील उपस्थित होते.