रविवारी बूथ व्हिजन संमेलनात हजेरी लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दर्शनासाठी थेट वाराणसीच्या (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिरात (kashi Vishwanath Temple) गेले. यावेळी मंदिराचा गाभारा नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. कारण १८७ वर्षांनंतर विश्वनाथ मंदिरामध्ये सोन्याचा पत्रा मढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीची खूप स्तुती केली.
[read_also content=”डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आमदार रविंद्र चव्हाणांनी व्यक्त केला संताप, म्हणाले…. https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/bjp-mla-ravindra-chavhan-reaction-about-attack-on-manoj-katke-nrsr-246650.html”]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजा केल्यानंतर मंदिराचं कार्य बघून ते अद्भूत आणि अकल्पनीय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, सुवर्ण मुलाम्यामुळे विश्वाच्या नाथाच्या दरबाराचे एक वेगळेच विलोभनीय दृश्य दिसत आहे. पंतप्रधान मोदी साधारण सहा वाजता मंदिर परिसरात पोहोचले. मंदिराचे पुजारी सत्यनारायण चौबे, नीरज पांडे आणि श्रीदेव महाराज यांनी मोदींच्या हस्ते शंकराची षोडशोपचारे पूजा केली.
PM Shri @narendramodi prays at the Kashi Vishwanath Dham in Varanasi. https://t.co/XDlAC8TCuq
— BJP (@BJP4India) February 27, 2022
याआधी मोदींनी काशीमध्ये एका सभेलाही संबोधित केले. ते म्हणाले की, त्रिशूलाच्या पुढे कोणताही माफिया, कोणी दहशतवादी टिकू शकतो का? काशी सगळ्या देशाला दिशा दाखवत आहे. इथे काही दिवसांपूर्वी अन्नपूर्णेची प्रतिमादेखील पुन्हा स्थापित करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, पूर्वी काशीच्या घाटावर मंदिरावर बॉम्बस्फोट होत होते. दहशतवाद्यांना कोणतीही भीती नव्हती. कारण त्यावेळची समाजवादी सरकार त्यांच्यासोबत होती. सरकार खुलेआम दहशतवाद्यांचे खटले मागे घेत होते. मात्र काशी कोतवाल बाबा काळभैरव यांच्यासमोर कोणाचं काही चालतं का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.