“नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा.
किरण मानेंची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करत किरण मानेंनी नागराज मंजुळे यांची एक कवितादेखील शेअर केली आहे. किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकल्यामुळे ते चर्चेत आले होते. आणि आता पुन्हा एकदा पोस्ट केल्याने ते चर्चेत आहेत. पण यंदा कारण ‘झुंड’चं आहे.
हा सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.