अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्न बंधनात अडकली आहे. काल तिच्या वाढदिवसानिमित्त तिने ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. ७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला. सोनालीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कुणाल बेनोडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर सध्या कुणाल आणि सोनालीच्या जोडीची चर्चा सुरू आहे. सोनालीचा पती कुणाल नक्की आहे तरी कोण ते जाणून घेऊयात.
२ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा पार पडला. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं.
त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं. लग्नानंतर आता सोनाली दुबईतच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. शूटिंगनिमित्त ती भारतात येईल, असं समजतंय. सोनालीच्या सर्व सहकलाकारांनी, मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.






