कल्याण आणि डोंबिवली येथील काँग्रेस पक्षात मोठा राजकीय फेरबदल करण्यात आला असून नवीन सिंह यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी तर अमित म्हात्रे यांची डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन सिंह आणि अमित म्हात्रे हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी सातत्याने जनतेसाठी आवाज उठवल्याने पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.