बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीत एक चित्रपट म्हणजे शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘कुछ कुछ होता है’. ९० च्या दशकातील मुलांचा हा चित्रपट अगदी तोंडपाठ आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीत या शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात बालकलाकारांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
त्यातलीच एक भूमिका म्हणजे परजान दस्तूर याची. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रिय झालेला हा चिमुकला आता मोठा झाला असून नुकतीच तो बोहल्यावर चढला आहे.
[read_also content=”मनोरंजन‘मुळशी पॅटर्न’ च्या घशानंतर येणार ‘जग्गु आणि Juliet’, ९० टक्के चित्रीकरण होणार युरोपात! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/upcoming-marathi-movie-jaggu-and-juliet-nrst-73295/”]
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेयसी डेलना श्रॉफ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परजानने पारंपरिक २०२० मध्ये परजानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर लग्न करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर परजान व डेलनाने लग्न केलं आहे.
परजानने ‘कुछ कुछ होता हैं’ व्यतिरिक्त ‘मोहब्बतें’, ‘परजानियाँ’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिकंदर या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला होता.