फोटो सौजन्य: iStock
ऑगस्ट 2025 मध्ये देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट पाह्यला मिळाली. Maruti Suzuki पासून ते Tata Motors आणि Hyundai पर्यंत सर्व कंपन्यांना याचा फटका बसला आहे. याचे सर्वात मोठे कारण सरकार जीएसटी स्लॅबमध्ये कपात करणार असल्याची चर्चा. खरं तर, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी सांगितले होते की दिवाळीपूर्वी नवीन जीएसटी स्लॅब लागू केले जातील. त्यामुळे नवीन कार खरेदी करण्याऐवजी, लोक स्वस्त किमतीत कार मिळावी म्हणून GST दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. या कारणास्तव, सलग चौथ्या महिन्यात विक्रीत घट झाली आहे.
उद्योग अहवाल दर्शवितात की ऑगस्ट 2025 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री वर्षानुवर्षे 7.3% घसरून 3,30,000 युनिट्सवर आली. गेल्या वर्षी याच महिन्यात 3,56,000 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. या आकडेवारीवरून असे दिसून येते की बाजार दबावाखाली आहे आणि ग्राहक जीएसटी कधी कमी होणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ऑगस्टमध्ये एकूण 1,80,683 युनिट्सची विक्री केली. कॉम्पॅक्ट कारची (बलेनो, स्विफ्ट, डिझायर) विक्री वाढली असली तरी, एसयूव्ही सेगमेंटमध्ये 14% घट झाली. ऑगस्ट 2025 मध्ये टाटाने 43,315 युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% कमी आहे. देशांतर्गत बाजारात 7% घट झाली. मात्र, निर्यातीत 573% ची प्रचंड वाढ झाली. दुसरीकडे, ह्युंदाईबद्दल बोलायचे झाले तर, विक्री 4.23% ने घसरून 60,501 युनिट्सवर आली. महिंद्राची एसयूव्ही विक्री 9% ने घसरून 39,399 युनिट्सवर आली.
जीएसटी सुधारणांबद्दलच्या प्रतिक्षेमुळे चारचाकी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला, तर दुचाकी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. बजाज ऑटोची देशांतर्गत विक्री 12% ने घसरली, परंतु टीव्हीएस मोटरची विक्री 28% ने वाढून 3,68,862 युनिट्सवर पोहोचली. रॉयल एनफील्डने 57% ची मजबूत वाढ नोंदवली, तर हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीतही 8% वाढ झाली. यावरून हे स्पष्ट होते की जीएसटी सुधारणांचा परिणाम कारवर जास्त झाला आहे, तर बाईक मार्केट अजूनही मजबूत आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने आधीच इशारा दिला होता की जीएसटी सुधारणांना विलंब झाल्यास सणासुदीच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. आता ही परिस्थिती खरी ठरताना दिसत आहे. दिवाळीपूर्वी जीएसटी दरांमध्ये कपात केल्यानंतर कारच्या किमती 7-8% ने कमी होतील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी परत येऊ शकतात. दुसरीकडे, सणासुदीच्या हंगामात दुचाकी कंपन्यांना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.