मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या आयसीयूमध्ये आहेत. सध्या त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली.
लतादींदींच्या प्रकृतीबद्दल माहिती होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि डॅाक्टरांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. राज ठाकरे जवळपास दोन तास रुग्णालयात होते. लता दिदींच्या प्रकतीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी रुग्णालयाबाहेर जमू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्या डॅा. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली आहे.
रश्मी ठाकरे ठाकरे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि लतादिदींच्या प्रकृतीबाबत विचारणा केली.
रश्मी ठाकरे यांच्यानतंर जेष्ठ गायिका आशा भोसले यांनीही रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.
[read_also content=”हॉलिवुडच्या ॲक्शनपटात प्रियंका चोप्राची एन्ट्री, ‘एंडिंग थिंग्स’मध्ये अभिनेता अँथनी मैकी सोबत स्क्रीन शेयर करणार https://www.navarashtra.com/entertainment/priyanka-chopra-will-share-screen-with-anthony-mackie-in-ending-things-movie-nrps-232961/”]