कोरेगाव : राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या पळशी-गुजरवाडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाकाली सहकार पॅनेलने एकूण 13 पैकी 8 जागा जिंकत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा धुव्वा उडवत या सोसायटीत परिवर्तन घडवलं.
कोरेगाव तालुक्यातील बिचुकले सेवा सोसायटी पाठोपाठ पळशी विकास सेवा सोसायटी निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का देत या दोन्ही सोसायटीत सत्तांतर घडल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आमदार शशिकांत शिंदे गटासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट राखण ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
पळशी गुजरवाडी विकास सेवा सोसायटीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या विजयासाठी विनोद भोसले, सुरेश आफळे, विकास पवार, मधुकर भोसले यांनी काम केले तर सत्ताधारी राष्ट्रवादी पॅनेलसाठी जयदीप पिसाळ, बादशहा इनामदार, प्रकाश पवार यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी सत्ताधारी पॅनेलला अवघ्या 5 जागांवर समाधान मानव लागलं तर या सोसायटीत आमदार महेश शिंदे गटाचे केदारनाथ आफळे, दिनेश गायकवाड, महादेव पिसाळ, हणमंत पिसाळ, प्रवीण दिसले, अरुण गायकवाड, शिला पिसाळ, कविता गायकवाड विजयी झाल्या.