महिंद्रा थार जबरदस्त इन डिमांड , अवघ्या ४ दिवसांत बंपर बुकिंग्स
नवी दिल्लीः Mahindra ने याच महिन्यात २ ऑक्टोबर रोजी आपली प्रसिद्ध ऑफरोडर Mahindra Thar चे न्यू जनरेशन मॉडल लाँच केले आहे. या जीपला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कारच्या लाँचिंगला आता केवळ चार दिवस झाले आहेत. कंपनीने सांगितले की, आतापर्यंत थारची ९ हजारांहून जास्त बुकिंग्स झाली आहे. कंपनीने लाँचिंग नंतर २ ऑक्टोबरला या कारची बुकिंग्स ओपन केली होती.
कंपनीने सांगितले की, या कार संदर्भात ३६ हजारांहून जास्त लोकांनी चौकशी केली आहे. ३.५ लाखांहून जास्त लोकांनी वेबसाईटला भेट दिली आहे. कंपनीने सांगितले की, कनवर्टिबल टॉप आणि ऑटोमॅटिक टॉप अँड व्हेरियंट्सची डिमांड सर्वात जास्त आहे.
[read_also content=”किआ, एमजी आणि ह्युंदाई…भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार https://www.navarashtra.com/latest-news/upcoming-mahindra-to-kia-top-cars-to-launch-in-india-this-year-23890.html”]
या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स दिले आहेत. ड्यूल फ्रंट एयरबॅग, ABS, EBD, रिवर पार्किग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम रोल ओवर मिटिगेशन, हिल होल्ड असिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल यासारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्राने थारची ॲग्रेसिव किंमत ठेवली आहे. २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सेकेंड जनरेशन महिंद्रा थार ९.८ लाख रुपयांच्या किंमतीसोबत लाँच केली आहे. तर या कारचे टॉप मॉडलची किंमत १२.९५ लाख रुपये ठेवली आहे.






