अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे. सध्या सोशल मीडियावर मीराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मीराने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मीराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मीरा एका कारमध्ये बसताना दिसते. दरम्यान तिने चॉकलेटी रंगाचा टॉप आणि त्यावर शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. मीराने परिधान केलेल कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय.
एका यूजरने ‘तू मुलीचा स्कर्ट घातला आहेस का?’ असे विचारले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हिने पण ओव्हर अॅक्टिंग करणं सुरु केलं आहे का?’ असे म्हटले आहे. एका यूजरने तर चक्क मीराची तुलना अभिनेत्री करीना कपूर खानशी केली आहे. ‘करीनाचा ड्रेसिंग सेन्स या पेक्षा चांगला आहे’ असे एका यूजरने म्हटले आहे.