धाराशिव जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला असून, मोठ्या नद्या वड्याला पूर आला आहे. यामुळे नद्यांचे पाणी शेती पिकामध्ये घुसून शेती पिकांचे तसेच गावातील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मी स्वतः व खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी करून काल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच कृषी मंत्री यांची भेट घेऊन इतर जिल्ह्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्याला देखील तात्काळ नुकसान भरपाई ची मदत द्यावी, अशी विनंती केली. जर लवकर मदत नाही मिळाली तर शिवसेना रस्त्यावर उतरूनआंदोलन करेल.