महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) या नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्वतःच्या कामामुळे आणि त्यांच्या फॅशनमुळे त्यांनी समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. अमृता फडणवीस यांच्या फॅशनमुळे त्यांचा सोशल मीडियावर चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
अमृता फडणवीस अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. त्यावेळी त्या प्रामुख्याने ट्रेडिशनल साडी नेसून कार्यक्रमांना जातात. अमृता फडणवीस यांनी नेसलेल्या प्रत्येक साडी लूकमुळे महिलांना प्रेरणा मिळते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक साड्यांमधील फोटो त्यांचा सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर केले आहेत. तसेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्स करण्यात आल्या आहेत. अमृता फडणवीस यांचे नवीन लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.चला तर पाहुयात अमृता फडणवीस यांचे ट्रेडिशनल लुक..
अमृता फडणवीस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्या राजकीय, सामाजिक आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावतात.
अमृता फडणवीस आपल्या चाहत्यांना नेहमीच फॅशन टिप्स देतात. त्यांनी नेसलेल्या साड्यांचे लूक अनेकांना प्रेरणा देतात.
निळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनची दाक्षिणात्य साडीमध्ये अमृता फडणवीस अत्यंत स्टायलिश आणि रॉयल दिसत आहे. सध्या सगळीकडे कांजीवरम साडीची मोठी क्रेज आली आहे.
अमृता फडणवीस यांनी नेसलेली लाल बनारसी साडी अत्यंत क्लासी असून त्यावर गोल्डन फ्लोरल प्रिंट असून गोल्डन बॉर्डर करण्यात आली आहे.
अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून त्या नवनवीन फोटो शेअर करत असतात. त्यांचा साडीमधील मॉर्डन लुक चाहत्यांना फारच आवडतो.