नवी दिल्ली : सोशल मीडिया म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने येतात काही साइट्सची नावं. यात फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि इन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या साइट्स म्हणजेच काही सोशल मीडिया नाही पण या कंपन्यांचे युजर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्या कंपन्या आता त्यांच्या मनाप्रमाणे नियम करून ते पाठण्याचं बंधन ग्राहकांवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापैकी ट्विटर (Twitter) या मायक्रोब्लॉगिंग साइटचे अधिकारी आणि भारत सरकारचे अधिकारी यांच्यातही सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भारत सरकारने लागू करायला सांगिललेल्या गोष्टी ट्विटर अमान्य करत असल्याने सरकारने कंपनीला नियम न मान्य केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. भारतातच नव्हे तर इतर देशांतही ट्विटरवर कारवाई केली जात आहे. नायजेरिया सरकारने (Nigeria Government) ट्विटरवर बंदी घातली आहे. या सरकारने आपलं अधिकृत अकाउंट मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू (KOO) वर उघडलं आहे.
[read_also content=”औषधांचा महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा का नाही?; उच्च न्यायालयाने घेतले फैलावर https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-mumbai-high-court-questions-to-central-government-why-there-is-not-enough-supply-of-medicines-to-maharashtra-nrvb-140953.html”]
कू कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी कूवर गुरुवारी पोस्ट करून सांगितलं, ‘ नायजेरिया सरकारचं अधिकृत अकाउंट आता ‘कू’ वर आहे.’ विशेष म्हणजे राधाकृष्ण यांनी याबद्दल ट्विटही केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘नायजेरिया सरकारनं कू इंडियावर सुरू केलेल्या अधिकृत अकाउंटचं मी स्वागत करतो. आम्ही आता भारताबाहेरही आमच्या कक्षा रुंदावत आहोत.’
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहाम्मादु बुहारी( Muhammadu Buhari) यांनी नायजेरियातील विघटनवादी शक्तींबद्दल एक ट्विट केलं होतं. ते ट्विटरने काढून टाकलं होतं. त्यानंतर नायजेरिया सरकारने ट्विटर कंपनीवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेऊन भारतीय कंपनी कूच्या साइटवर आपलं अधिकृत अकाउंट सुरू केलं आहे.
[read_also content=”रेल्वे ट्रॅकवर करायला गेला बाइक स्टंट, ट्रेन आली आणि पुढे काय घडलं; पाहा VIDEO https://www.navarashtra.com/latest-news/on-railway-track-boy-was-shooting-bike-stunt-and-suddenly-railway-passing-through-track-video-viral-social-media-nrvb-140874.html”]
अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी गेल्या वर्षी कू या मायक्रोब्लॉगिंग साइटची सुरुवात केली. भारतीय युजर्सना भारतीय भाषांमधून आपले विचार मांडता यावेत या उद्देशाने त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. मराठी (Marathi), हिंदी, तेलुगू, तमिळ, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये कूची सेवा सध्या उपलब्ध आहे आणि लवकरच अन्य भारतीय भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे.
भारत सरकारच्यावतीने 2020 मध्ये आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंज नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कू ॲपने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमातून कू ॲप वापरण्याचं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. त्यानंतर या कूबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली होती.
on indian koo app nigeria government create official account