(फोटो सौजन्य - इन्सटाग्राम)
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबद्दल दिलेल्या अलिकडच्या निर्णयानंतर, कन्नड अभिनेत्री आणि माजी खासदार रम्या हिने सोशल मीडियावर एक वक्तव्य केले आहे.ज्यामुळे वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या वक्तव्यामुळे पुरूषांचा अपमान झाला आहे. असं अनेकांचं म्हणणं आहे. यामुळे राम्यावर टीकाही होत आहे.
दक्षिण भारतीय अभिनेत्री रम्या (दिव्या स्पंदना)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, यावेळी तिच्या पोस्टवरून संताप व्यक्त होत आहे. तिने भटक्या कुत्र्यांबद्दलएक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.रम्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रस्त्यावरील कुत्रे आणि लोकांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शेअर केला. 7 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांपासून असलेल्या धोक्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

(फोटो सौजन्य – इन्सटाग्राम)
न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, “आम्हाला माहित आहे की हे घडत आहे. मुले आणि प्रौढांना कुत्रे चावत आहेत, लोक मरत आहेत. गेल्या २० दिवसांतच प्राण्यांशी संबंधित रस्ते अपघातांमध्ये दोन न्यायाधीशांचा समावेश होता.” न्यायालयाने म्हटले आहे की कोणता कुत्रा चावेल आणि कोणता चावेल हे सांगणे कठीण आहे न्यायालयाने रस्त्यांवर, शाळांमध्ये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये कुत्र्यांमुळे होणारे अपघात आणि सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
या आदेशावर भाष्य करताना अभिनेत्री रम्या लिहिते की, पुरूषाचे मनही आपण वाचू शकत नाही, कोण बलात्कार किंवा खूनासारखा गुन्हा कोण करेल माहित नाही. तिने विचारले, “याचा अर्थ सर्व पुरूषांना तुरुंगात टाकले पाहिजे का?” असा सवाल राम्याने विचारला आहे. राम्याने तिच्या या पोस्टमधून न्यायालयाच्या व्यापक निर्णयावर टीका केली आहे.एखादा कुत्रा चावतो म्हणून सर्व दोषी ठरत नाही, असं तिचं म्हणणं आहे. पण ”सर्व पुरूषांना तुरूंगात टाकायला पाहिजे का?” असा प्रश्न तिने विचारला आणि तिची हो पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली.
The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video
सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्रीने भटक्या कुत्र्यांची तुलना सर्व पुरुषांशी केल्यावर टीका केली आहे आणि हा पुरुषांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तिच्या स्टोरीचेस्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बहुतेक लोक तिच्या विचारांवर संतापले आहेत, तर काहींनी रम्याला तिचे विचार व्यक्त करण्याच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर दिल्या जात आहेत.
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केली एन्ट्री






