पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्योजकांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील हॉटेल व बार मालकांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी आपले हॉटेल व बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल मालक डॉ हेरंब शेळके यांनी घेतला आहे.
पुण्यातील लोकप्रिय बार 1 बीएचके, 2 बीएचके, महाराजा वाईन्स् आणि बॉलर ही सर्व हॉटेल व बार 22 जानेवारी रोजी उद्घाटन सोहळ्यानिमित्त बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर हॉटेव व बारच्या सर्व शाखा सोमवारी बंद असणार आहे. सगळ्या देशभरातून रामभक्त या सोहळ्याची तयारी करत असून 22 जानेवारी साजरी करणार आहेत. त्यामुळे 1 बीएचके, 2 बीएचके, महाराजा वाईन्स् आणि बॉलर या बार व हॉटेल मालकांनी स्त्युत्य निर्णय घेतला आहे.