रेल्वेमध्ये धमकीचा मेसेज लिहिल्यामुळे भुसावळमध्ये महानगरी एक्सप्रेसची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Railway Checking: जळगाव : राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला. यामध्ये 9 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्लास्टमुळे महाराष्ट्र हाय अलर्टवर आहे. मुंबई आणि इतर जिल्ह्यातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला. या पार्श्वभूमीवर भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडा पहारा आहे. महानगरी -एक्स्प्रेसची या दोन्ही स्थानकांवर कसून तपासणी करण्यात आली.
मुंबईहून बनारसकडे जाणाऱ्या महानगरी -एक्स्प्रेसमधील एका कोचच्या शौचालयात – एक्स्प्रेस बॉम्बने उडून देण्याची धमकी देणारा संदेश लिहिलेला आढळला. पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली. ही गाडी भुसावळ येथे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी पोहोवताच रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी व बीडीएस स्कॉडने संयुक्त कारवाई केली. यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच थरार दिसून आला. नागिरकांनी देखील यावेळी पोलीस दलाला पूर्णपणे सहकार्य केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जळगावमध्ये संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली असता, ही केवळ अफवा असल्याचं समोर आले. मजकूर कोणी तरी पुसून टाकला, मात्र कोणत्या उद्देशाने असा मजकूर लिहिला गेला, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहेत. जळगाव आणि भुसावळ – स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवावे. तसेच शांतता राखून सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गाडीची तपासणी पूर्ण केल्यानंतर सकाळी नऊ वाजता ती भुसावळ स्थानकावरून सुरक्षितपणे रवाना करण्यात आली, या घटनेचा तपास सुरू असून, संबंधित प्रवासी वा संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे, अशी मागिती भुसावळचे लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर चायकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर भुसावळचे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकपी. आर. मीना यांनी सांगितले की, “सदर माहिती दादर येवून मिळताच सर्व स्थानकांना सतर्क करण्यात आले. स्वच्छतागृहात पाकिस्तान झियाबाद’ आणि ‘ ISI असे लिहिलेले आढळले, मात्र ते पुसण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसले. भुसावळ येथे BDDS पथकाने गाडीची संपूर्ण तपासणी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तु न आढळल्याने, सकाळी ९ वाजता गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. ” अशी माहिती त्यांनी दिली आहे.






