छत्रपती संभाजीनगर: येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून या निमित्त तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार, तहसीलदार सतीश सोनी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांना माहिती दिली. यावेळी सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यात एकूण ५४ हजार ८०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यात २८ हजार २७६ पुरुष मतदार, २६५२९ महिला मतदार तर ०३ इतर मतदारांचा समावेश असणार आहे.
शहरात एकूण ६१ मतदान केंद्रे
निवडणुकीसाठी शहरात एकूण ६१ मतदान केंद्रे असणार आहे. तर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष व्यवस्था असणार आहे निवडणूक लढविणार्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज ऑनलाइन केल्यानंतर तहसील कार्यालय येथे जमा केल्या शिवाय त्याचे उमेदवारी अर्ज अंतिम समजल्या जाणार नाही.
शहरात ४ बैठे पथक, ३ फिरते पथक तैनात
उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारणे, विविध पदयात्रा, पक्ष कार्यालय, प्रचार वाहन परवानगी, सभेची परवानगी यासाठी तहसील कार्यालय येथे एकूण ५ टेबल लावण्यात आले आहे तेथूनच उमेदवाराने परवानग्या घ्यायच्या आहे. निवडणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ४ बैठे पथक, ३ फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाची निवडणूक लढविणार्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने जी खर्चाची मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेबाहेर त्यांना खर्च करता येणार नाही निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशेब प्रत्येक उमेदवाराला द्यायचा आहे. उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब काटेकोरपणे बसावा यासाठी विविध पथकांद्वारे व्हिडीओ शूटिंग, फोटो काढण्यात येणार आहे जेणेकरून खोटी माहितीला चाप बसेल, अशी माहिती देत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्व पक्ष, अपक्ष उमेदवारांनी दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे भंग केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
११०२ दुबार मतदारांशी संपर्क करणार
मतदार यादीत एकूण ११०२ दुबार मतदार असल्याचे निदर्शनास आले असून या दुबार नावे असलेल्या मतदारांशी संपर्क करण्यात येणार असून त्यांच्याकडून त्यांच्या संमतीनुसार ते मतदार कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहे तसे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. दोन पैकी एका ठिकाणचे नाव वगळण्यात येणार आहे. तसेच मयत मतदार जर मतदार यादीत असेल तसे निदर्शनास आल्यास ते देखील नाव वगळण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना दिली.
कायदा सुव्यवस्थेत साभाळण्याचे आवाहन
निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी केमेरे बसवले आहेत. त्यावरून सर्व हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात करण्यात येणार आहे. कुणी गोंधळ घातला व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई होईल, असे पो. नि. शेषराव उदार यांनी सांगितले.






