सांगली : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर कायदा-व्यवस्थेला धोका आहे, असे देखील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी सांगितले. ते सांगलीत अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी आले होते, यावेळी माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणांवर काही मतभेद व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे. तर कोणी चमकुगिरी म्हणून वाटेल तशी निवेदन देणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कायदा-व्यवस्थेला धोका आहे. नेत्यांनी न्यायालयात दाद मागावी. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जात आहे. हे योग्य नसल्याचे निकम म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
गुन्हा घडता कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य स्तुत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या उज्ज्वल निकम यांच्याकडून कौतुक केले आहे. पण मनुष्य स्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्वाचा घटक, न्यायालये असली पाहिजेत. मात्र, न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुख्यमंत्र्याचा उदात्त हेतू आहे.