मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचे काही तोटेही समोर येत आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाइन क्लास सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे.
विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात ऑनलाइन वर्ग सुरु होता. या दरम्यान काही टवाळखोरांनी चालु वर्गात अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. वर्ग सुरू असतानाच पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. मागील आठवड्यात ही घटना घडली असून संबंधित प्राध्यपकांनी याची गंभीर दखल घेत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात आयपीसी २९२, ५७० आणि सायबर गुन्हेअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कोरोना संकटामुळे गेले दीड वर्ष शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरु असताना अनेक अशा घटना समोर येत आहेत. याआधीही वेगवेगळ्या शहरातून अशा घटना समोर आल्या होत्या. काही ठिकाणी तर शिक्षकांची टिंगल करणं व अपशब्द वापरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]