– उत्तम पालक होण्याचा प्रयत्न करावा
सरपंच सुर्यकांत सवाणे यांनी सांगितले की, घरातील मुलांसाठी पालकांनी उत्तम पालक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलगा पडला की त्याला उचलायला जाऊ नका. त्याला स्वतःहून उठू द्या. अंगावरील धूळ झटकू द्या. मुलांना हवं ते करू द्या ते करू शकतात असे म्हणत यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. व्यायाम शरीर मन आणि आत्मा यांना संतुलित आणतो म्हणून मुलांना व्यायामाचे महत्व पटवून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गवळी यांनी केले तर आभार सुहास गायकवाड यांनी मानले.






