जालना : एमआयएमला (AIMIM) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं. असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
एमआयएमने महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. मात्र आता टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. टोपे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर, यावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर टिका करणे सुरू केलं आहे. शिवसेना हिरवी सेना झाल्याची खोचक टीका भाजपने केली आहे.
[read_also content=”आधी डिजेच्या तालावर धरला ठेका आणि मग… https://www.navarashtra.com/crime/boy-died-after-danced-on-dj-in-holi-celebraation-nrps-256725.html”]
[read_also content=”काँग्रेसमध्ये जी-23 वरुन राजकारण तापलं, नेतृत्त्व, संघटना, गट-तट यावरुन अंतर्गत मतभेद चव्हाटावर, पक्षश्रेष्ठी समोर नवीन आव्हान https://www.navarashtra.com/india/politics-heats-up-in-g-23-in-congress-internal-differences-over-leadership-organization-factions-new-challenges-in-front-of-the-party-supremacist-256743.html”]