मंगळवारी जल्लोषात अनेक कलाकार मंडळीनी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. बॅालिवूडचा किंग खान सह अनेक कलाकारांनीस घरी गणरायाची स्थापना केली. महाराष्ट्रातील लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख (Riteish Deshmukh Genelia Deshmukh) काल त्याच्या घरी गणपतीची स्थापना केली. यावेळी रितेश आणि जिनिलियाच्या घरी खास बाप्पा आले आहे. रितेश-जिनिलियाच्या मुलांनी ‘रिसायकल बाप्पा’ चं आगमन झालं आहे. यावेळी रितेशच्या मुलांनी आरती गात गणपत्तीचं स्वागत केलं. त्यांच्या हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून त्यांच कौतुक केलं जात आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या मुलांनी खास रिसायकल बाप्पा घडवला आहे. रियान आणि राहिल ही रितेशची मुलांनी हा अनोखा बाप्पा घडवला आहे. यावेळी रितेश आणि जिनिलियानेही त्यांना मदत केली. या निमित्ताने त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रियान आणि राहिल बाप्पाची मूर्ती घडवत असून मराठीमध्ये बाप्पाची आरती गाताना दिसत आहे. ‘सुख करता दुख हर्ता, वार्ता विघ्नाची’ ही आरती ते म्हणत आहेत.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या घरी गणोशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रितेश नेहमीच पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याला प्राधान्य देतो. यावेळी ही त्याच्या घरी उत्साह पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी लोखंडाच्या पार्ट्सपासून रिसायकल बाप्पाची मूर्ती बनवली आहे. थोडी हटके बाप्पाची मूर्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिल्याने देशमुख कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सर्वांच लाडकी जोडी नेहमीचं त्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मंगळवारी मुकेश अंबानी आणि निता अंबानीच्या घरी उपस्तथित राहत त्यांनी गणपतीचं दर्शन घेतंल. काही दिवसांपूर्वी जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.