सध्या झुंड (Jhund) या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतोय. बॉलिवूड असो किंवा मराठी सेलिब्रिटी प्रत्येकाला या सिनेमाने भुरळ घातली आहे. आणि नुकताच हा सिनेमा रितेश देशमुखनेही पाहिला. त्याला देखील झुंड लय भारी आवडला.
नुकतीच रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत दिग्दर्शक नागराज मंजुळेला (Nagraj Manjule) देशीतील चांगला दिग्दर्शक, असं म्हटलं आहे.
रितेशनं पोस्टमध्ये लिहिले, ‘सर्वांनी कृपया झुंड हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा. नागराज मंजुळे हा आपल्या देशातील चांगला दिग्दर्शक आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक विचार तुमच्या मनामध्ये येतील’
रितेश त्याच्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांचं देखील कौतुक केलं आहे. ‘अमिताभ बच्चन सर तुम्ही या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. तुमचा हा अनोखा आंदाज खूप आवडला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं चांगलं काम केलं आहे.’ या पोस्टमध्ये रितेशनं अजय- अतुलचं देखील कौतुक केलं आहे.
4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.