Appreciation of Shishya Hitman by Guru Dinesh Lad : ‘आज डोळ्याचे पारणे फिटले, रोहितने मला आज मोठा आनंद दिलाय. क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ आहे, असे म्हटले जाते पण रोहितने हे खोटे करून दाखवले. एका गरीब कुटुंबातील एक मुलगा त्याला संधी मिळाल्यानंतर काय करू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रोहित शर्मा होय’. सुरुवातील गोलंदाजी करणारा हा पोरगा, त्याची बॅटींगसुद्धा चांगला करायचा. मी त्याला फलंदाजीवर लक्ष्य करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याच्यात एवढा प्रोग्रेस झाला की, तो शाळेत असतानाच तो ओपनिंग करायचा त्यानंतर त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. परंतु, त्याला ओपनिंग संधी मिळाली नाही.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा यशस्वी
रोहित जबरदस्त शॉट खेळायचा, परंतु त्याला साजेसा खेळ करायला सुरुवातीला टीम इंडियामध्ये संधी मिळायची नाही. पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचे कौतुक होईल, त्याने ती संधी दिली. आणि या संधीचे रोहितने सोने केले. पुढे हेच त्याचे श्रम त्याला कर्णधारपदाकडे घेऊन गेले. कर्णधार म्हणून रोहित शर्मा यशस्वी झाला यामध्ये त्याचा स्वभाव कारणीभूत ठरला.
प्रत्येक खेळाडूला दिले लक्ष्य
रोहित शर्मा पहिल्यापासून आपल्यासोबतच्या खेळाडूंना घेऊन जाणारा खेळाडू आहे. संघात चांगले वातावरण कसे राहील, याची काळजी घेणारा आहे. त्याने वन-डे वर्ल्ड कप हरल्यानंतर कोणत्याही खेळाडूला दुखवले नाही. आणि आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची क्वालिटीनुसार केवळ त्याचे लक्ष्य सांगितले. हेच त्याच्या यशाचे गमक आहे.
टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात अफलातून विजय
द. अफ्रिका 177 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली खरी परंतु त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. पण, द. अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली सलामीवीर रिझा हेंन्डीक्स लवकर बाद झाला, त्यानंतर कर्णधार एडन मार्कराम बाद झाला. त्यानंतर खरी मॅच खेळली क्विंटन डी कॉक आणि ट्रिशन स्टब्सने, या दोघांनी अफ्रिकेसाठी मोठी भागीदारी करीत अफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. त्यानंतर स्टब्सला अक्षरने क्लिन बॉल्ड करीत पुन्हा अफ्रिकेला झटका दिला. त्यानंतर आलेल्या हेन्री क्लासेनने धमाकेदार खेळी करीत अफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. त्याने अवघ्या 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पण, हार्दिकने त्याला झेलबाद करीत मॅच फिरवली. पुढचे काम भारतीय गोलंदाज अर्शदीप, बुमराहने करून टाकले. क्लासेनची विकेट अन् डेव्हीड मिलरचा कॅच ठरला निर्णायक. सूर्याने पकडलेला कॅच नव्हता तर मॅच होती. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.