• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Satara Hill Marathon On Sunday Nrka

सातारा हिल मॅरेथॉनचा रविवारी थरार

सातारा जिल्हा प्रशासनाने यावर्षी ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’चे संयोजन नेहमीपेक्षा खूप छोट्या प्रमाणावर व नियमांना अधीन राहून करण्यास परवानगी दिली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 11, 2021 | 02:54 PM
सातारा हिल मॅरेथॉनचा रविवारी थरार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून रविवारी (दि.१२) ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मॅरेथॉनच्या संयोजन समितीने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

कोरोना साथीची तीव्रता कमी झाल्याने तसेच लसीकरण मोहीम देशभरात व खासकरून महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, गोवा यांसह देशभरात व जगभरातही अनेक मोठ्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने यावर्षी ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’चे संयोजन नेहमीपेक्षा खूप छोट्या प्रमाणावर व नियमांना अधीन राहून करण्यास परवानगी दिली आहे.

सातारा हिल मॅरेथॉन गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नाही. पण यावर्षी नेहमीपेक्षा केवळ पंचवीस टक्के स्पर्धकांना घेऊन व त्याबाबतचे सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क लावणे, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे, निर्जंतुकीकरण इत्यादी सर्व निकष पाळून यावर्षीची मॅरेथॉन यशस्वीपणे पार पाडण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.

मॅरेथॉनपटू सतत गतिशील असतात. एका जागी फार काळ थांबत नाहीत. त्यामुळे सहसा एकमेकांच्या जवळ जाण्याची शक्यता निदान धावताना तरी खूप कमी असते. धावायला सुरुवात करण्यापुर्वी वॉर्म अप करताना सर्व स्पर्धकांमध्ये योग्य अंतर राखले जाईल, याची खबरदारी घेणार आहोत. पोलिस कवायत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या साधारणपणे २० टक्के इतक्या लोकांनाच प्रवेश दिल्यामुळे तसे करणे सहज शक्य होईल. तसेच मॅरेथॉन संपल्यावर धावपटू एकत्र जमू नयेत यासाठी रन झाल्यावर लगेच त्यांना त्यांचे मेडल व नाश्त्याचे सीलबंद पाकीट हातात देण्यात येईल.

स्पर्धकांची संख्या नेहमीपेक्षा खूपच कमी असल्यामुळे यंदा गर्दी होणार नाही किंवा रांगा लागणार नाहीत. शिवाय यावेळी बक्षीस समारंभही ठेवलेला नाही. त्यामुळे रनर्स मंडळीना रन झाल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर मैदानाबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्पर्धेदिवशी ऑफिशियल बिब घातलेल्या रनर्सव्यतिरिक्त त्यांच्या कोणाही मित्रांना अथवा नातेवाईकांना त्याठिकाणी प्रवेश मिळणार नाही.

सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत याची खातरजमा केल्यावरच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आदल्या दिवशी शनिवारी एक्सपोच्या वेळी सर्व स्पर्धकांनी 28 नोव्हेंबरपूर्वी (स्पर्धेच्या आधी किमान 15 दिवस) लसीचा दुसरा डोस घेतला आहे याची तपासणी केली जाणार आहे. या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.

Web Title: Satara hill marathon on sunday nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2021 | 02:54 PM

Topics:  

  • Marathon

संबंधित बातम्या

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!
1

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.