(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बॉलीवूड जगात अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या फॅशन ट्रेंडसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु अनेक वेगवेगळ्या फॅशन्स चाहत्यांना पाहायला आवडत असते. तसेच अनेक अभिनेत्री कुर्ता सलवार, साडीशिवाय मोत्यांच्या ड्रेस मध्ये चमकताना दिसल्या आहेत. या ड्रेसचा ट्रेंड सध्या जास्त चर्चेत आहे. चाहत्यांना अभिनेत्रींना या ड्रेसमध्ये पाहून आनंद होत आहे, त्यांची फॅशन, लुक आणि मेकअप पाहण्यासारखा आहे. अश्याच काही बॉलीवूड अभिनेत्रींनवर नजर टाकुयात ज्याच्यामुळे हा ट्रेंड सुरु झाला आहे.
आलिया भट्ट:
आलिया भट्टने 2023 च्या मेट गालामध्ये लांबलचक पांढऱ्या रंगाचा प्रिन्सेस गाउन परिधान करून भव्य एंट्री केली होती. हा ड्रेस वेगवेगळ्या आकाराच्या मोत्यांनी तयार करण्यात आला होता. स्टायलिस्ट अनैता श्रॉफने बनवलेला आलियाचा लुक जबरदस्त मोत्यांचे झुमके, बेज्वेल्ड फिंगरलेस ग्लोव्हज आणि नाजूक अंगठ्यानी परिपूर्ण करण्यात आला होता. तिचा साधा मेक-अप आणि लांबलचक ड्रेस तिच्यावर खूप आकर्षित दिसत होता. ज्यामुळे मोठी हे विशेषण बनले.
जान्हवी कपूर:
जान्हवी कपूरची फॅशन सेन्स नेहमीच अनोखी आणि ग्लॅमरस राहिली आहे! NMACC लाँचच्या रेड कार्पेटवर जान्हवीने मनीष मल्होत्राचा कस्टम लेहेंगा परिधान केला होता. जान्हवीने एक सुंदर मोत्याचा सुशोभित केलेला ब्लाउज घातला होता आणि त्यात गुंतागुंतीच्या धाग्याचे काम असलेल्या लेहेंग्यासोबत एकत्र केले होते. तिचा केप दुपट्टा हा पर्ल डिटेलिंग आणि थ्रेड वर्कचा अप्रतिम संयोजन होता. तिचा लुक पर्ल चोकर, साधे क्रिस्टल स्टड आणि स्लीक बॅक बनने पूर्ण झाला होता, तर तिच्या चकचकीत आणि सूक्ष्म मेकअपने तिचे सौंदर्य आणखी वाढवले होते.
कुब्बरा सैत:
कुब्ब्रा सैत तिच्या फॅशनसाठी नेहमीच ओळखली जाते. यावेळी हजारो मोत्यांच्या थरांनी बनवलेल्या अभिषेक शर्माच्या गाऊनमध्ये ती मोत्यांच्या परी सारखी दिसत होती. तिने चमकदार डोळे आणि प्लम लिप शेडसह ग्लॅमरस मेकअप निवडला, ज्यामुळे तिला मोहक असे तेज आले. तसेच तिने या ड्रेस वर मोठे झुमके आणि सरळ केसांची स्टाईल निवडून हा लुक परिपूर्ण केला.
शरवरी वाघ:
NMACC गालामध्ये शर्वरी वाघने अबू जानी संदीप खोसला यांची सुंदर पांढरी साडी नेसली होती. साडीमध्ये रफल्स, पंख आणि डझनभर मोत्यांची सुंदर जोडणी होती. या साडीच्या ब्लाउजवर एकबाजूच्या खांदयावर हजारो मोत्यांची रचना होती. तिचा साधा मेकअप आणि ॲक्सेसरीजमुळे ती आणखी आकर्षित आणि सुंदर दिसत होती.
क्रिती सॅनन:
क्रिती सॅननने मनीष मल्होत्राची पांढरी सिल्क-सॅटिन साडी परिधान केली होती, ज्यामध्ये सूक्ष्म मोत्याचे तपशील होते. तिच्या लांब गळ्याच्या ब्लाउजमध्ये मोत्यांचे अनेक थर होते, ज्यामुळे तिच्या लुकमध्ये ग्लॅमरचा टच आला होता. क्रितीचे सरळ केस आणि चमकदार स्मोकी डोळ्यांनी हा क्लासिक लुक पूर्ण केला होता. या साडीमध्ये ती खूप रेखीव दिसत होती.