७ दिवसात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बडीशेप आणि वेलचीचे 'या' पद्धतीने करा सेवन
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नात प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीन तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. वारंवार स्किन ट्रीटमेंट आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केला जातो. पण कालातंराने त्वचा खूप जास्त ओढल्यासारखी वाटते. त्वचेचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी कायमच महागड्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून सुद्धा पहावेत. त्वचेला बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर त्वचेवर मोठे मोठे पिंपल्स आणि ऍक्ने येतात. हे पिंपल्स लवकर कमी होत नाही. याउलट त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. काळसर डाग, पिंपल्स, ॲक्ने जाऊन त्वचा स्वच्छ, नितळ आणि मुलायमपणा वाढवण्यासाठी कोणत्या महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
शरीराची पचनक्रिया सुरळीत चालू राहिल्यास चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग अजिबात येत नाही. पण पचनक्रियेच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आठवडाभरात चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी बडीशेप आणि वेलचीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसेल.
त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वेलची, बडीशेप आणि लवंगचा वापर करावा. यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात वेलची, बडीशेप आणि लवंग टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी उकळल्यानंतर अर्धे होईल. हे पाणी गाळून उपाशी पोटी नियमित प्यायल्यास महिनाभरात चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसेल. या पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर आतून स्वच्छ होईल. त्वचेच्या सौंदर्यत आठवडाभरात भर पडेल.
बडीशेप आणि वेलची शरीरासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय फायद्याचे आहेत. हे पदार्थ खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी मदत करतात. आठवडाभर नियमित वेलची आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होतील आणि त्वचा काचेसारखी चमकदार दिसेल. लवंगमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. तर बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ए, सी आणि ई यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.






